जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात बहुतांश जिल्हांत कोकणचा राजा असलेले फळ म्हणजे आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला असून, आंब्याचे प्रति डझन दर रुपये 300 पासून रुपये 700 पर्यंत आहेत.यंदाच्या वर्षी कोकणातील देवगड हापूस आंब्याची व रत्नागिरी हापूस आंब्याची आवक,महाराष्ट्र राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुबलक प्रमाणात झाली असून,आंब्याचे दर सुद्धा त्यामुळे सर्वसामान्यांना आंबा खाता येईल असे झाले आहेत.
फळांचा राजा असलेला आंबा हे फळ उन्हाळ्याच्या सिझनमध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.मधुमेही लोकांना मात्र आंबा फार खाणे शुगरच्या दृष्टीने हितकारक नाही.लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचे असलेले व फळांचा राजा असलेले आंबा हे फळ आवडीने खाल्ले जाते. त्याबरोबरच आंब्यापासून आमरस,आम्रखंड,आंबाबासुंदी, अंबावडी,अंबापोळी,वर्षभर पुरेल इतके आंब्याचा पल्प इत्यादी पदार्थ तयार करून खाल्ले जातात.
महाराष्ट्र राज्यांत सर्वच ठिकाणी कोकणचा राजा असलेल्या आंबा फळाची आवक मोठ्या प्रमाणात असून,आंब्याचे दर सर्वसामान्यांना परवडणारे म्हणजेच सध्या रुपये 300 प्रति डझन पासून रुपये 700 प्रति डझन पर्यंत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील कोकणात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर असल्यामुळे,आंबा पिकवण्यासाठी फार मोठी उपाययोजना करण्याची गरज नाही आहे.महाराष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी फळांचा राजा असलेले आंबा हे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.