महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथे चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी रेल्वे रोखून आंदोलकांकडून आक्रोश व्यक्त,.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी) 

महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथे आदर्श विद्या मंदिरातील चार वर्षीय दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी, आंदोलकांकडून रेल्वे रोखून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

बदलापूर येथे रेल्वे स्थानकावर संतप्त आंदोलकांकडून रेल्वे ट्रॅक वर उतरून,रेल्वे रोखून आंदोलन करण्यात आले. जवळपास दहा तास चाललेल्या आंदोलनास आंदोलकांकडून हिंसक वळण लागल्यानंतर,पोलिसांनी आंदोलकांच्यावर सौम्य लाठीमार केला.पोलिसांवर दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली.बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलक आक्रमक झाल्यानंतर,पोलिसांनी बचावात्मक परिस्थितीत सौम्य लाठीचार्ज केला आहे.

 दरम्यान लोकलच्या 50 फेऱ्या व लांब पल्ल्याच्या 8 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान बदलापूर येथील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून,मन हेलावून टाकणारी आहे.याप्रकरणी एस.आय.टी. स्थापन करण्यात आली असून,दोषी आरोपींवर खटला,फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून,लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

 बदलापूर येथे रेल्वे स्थानकावर संतप्त आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील व ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांची नेमणूक या खटल्यासाठी करण्यात आल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.दरम्यान बदलापूर येथे संबंधित मुलींचे पालक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतरही, संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याप्रकरणी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यासह एक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यात अशा अत्याचाराच्या घटना घडून नयेत म्हणून दोषी आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी राज्यातील नागरिकांच्या कडून भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top