जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सध्या राज्यातील जोरदार पावसामुळे लक्षणीय वाढ झाली आहे.गेले दोन दिवस राज्यातील पाऊस वाढला असून, कोकणातील धरणांमध्ये जवळपास 90% पाणीसाठा झाला असून,बहुतांश ठिकाणी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
ठाण्यामधील भातसा धरणामध्ये,मोडक सागर धरणामध्ये, तानसा धरणामध्ये अनुक्रमे 93.61%, 96.24%, 97.54% पाणीसाठा झाला आहे.त्यामुळे ठाणेकरांच्या वरचे पाणी संकट टळले आहे.राज्याच्या जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात मात्र सर्वात कमी पाऊस झाला असून,धरणातील पाणीसाठा कमी आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण आता 31.34% भरले आहे. बीड जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण 59.46%, येलदरी धरण 36.20% ,मांजरा धरण 13. 45%, विष्णुपुरी धरण 83.65% तर मोठ्या जलक्षमतेचे माजलगाव धरण मात्र शून्य टक्क्यावर आहे.
पुण्याचे भाटघर धरण 100% भरले असून,पवना धरण 98.02%, डिंभे धरण 92.40%, पानशेत धरण 98.83%, खडकवासला धरण 79. 11% भरले आहे. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर ,सांगली, सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या धरण साठ्यामध्ये सुद्धा सध्याच्या राज्यातील चालू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील दूधगंगा धरण 86%, राधानगरी धरण 94.76% साताऱ्यातील कोयना धरण 85.22% सांगलीतील वारणा धरण 85.33% भरले आहे.महाराष्ट्र राज्यातील नागपूर विभागातील 383 धरणांमध्ये आजमीतीस 78.66% टक्के पाणीसाठा झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा थोडा जास्त आहे. एकंदरीतच महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी बरसत असून,आगामी काळात धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मुबलक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.