*रानभाज्या उत्सव 2 व 3 ऑक्टोबर रोजी*
- वैज्ञानिक व लेखक डॉक्टर मधुकर बाचुळकर यांची माहिती
कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग हॉल येथे दिनांक 2 व 3 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत रानभाज्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती वैज्ञानिक व लेखक डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना डॉक्टर बाचुळकर म्हणाले, महात्मा गांधी जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून गार्डन क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, युथ एनेक्स निसर्ग अंकुर व कोल्हापूर वुई केअर हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून निसर्ग अंकुर संस्थेतर्फे रानभाज्यांची ओळख संवर्धन व संरक्षण याकरिता विविध कृतिशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन मार्गदर्शक पुस्तक निर्मिती रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिके व स्पर्धा तसेच रानभाज्या खाद्य महोत्सव याचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोध मोहीम राबविण्यात येते व विविध प्रदेशात वापरात असलेल्या नवनव्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना डॉ बाचुळकर म्हणाले, "लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स" या ब्रीद वाक्याचा अंगीकार करून आपण महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांची माहिती घेऊन चौकस आहारातून सदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी आबाला विरुद्ध तसेच सर्व नागरिकांनी या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना मिलिंद धोंड म्हणाले, प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते होणार असून वैज्ञानिक व लेखक डॉक्टर मधुकर बाचुळकर, रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कृषी
विभागीय अध्यक्ष उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के आणि इतर मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या पत्रकार परिषदेला प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, निसर्गमित्राचे अनिल चौगुले, डॉ. अशोक वाली, भाग्यश्री कलघटकी, गार्डन क्लबचे अध्यक्ष कल्पना सावंत , वृक्षप्रेमीचे अमोल बुड्ढे, सुशीला राय गांधी आदी उपस्थित होते.
- *प्रदर्शनात या रानभाज्यांची मिळणार माहिती.*
निसर्ग जैवविविधतेने समृद्ध आहे. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजवल्या व खाल्ल्या जातात. यामध्ये मुरुडा, सकाळू (वृक्षांवर उगवणारा अळू), तीन तोंडी मांजरी, उंदराचे कान, करणशिंगी, चार फुटी शेंगा, पपनस, बंपर फळ, सफेद मुसळी आदी अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच पाठवलं , दिंडा, कुडा, अंबुशी, पाथरी, करडू, शेवगा, बांबू, कोण आंबट, चुका चाकवत, केला पानांचा ओवा, कपाळाफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाठ, घोळ भाजी, अंबाडी, सुरण, टाकळा, मटारू, भुई, आवळा, कवठा, भारंगी आदी औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.