सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकांच वारं घुमू लागलं आहे. सर्व पक्ष निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. यातच गणेशोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून शिंदे गट आणि मनसे पक्षामध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होणार का?, याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे. शिंदे गटाबरोबर युती करायची की नाही याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज मनसेकडून गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्र किेनाऱ्यांवर जमा होणारा कचरा साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी त्यामध्ये अमित ठाकरेही उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी पत्रकांशी संवाद साधला. समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार आहे. आम्ही लवकरच आम्ही सत्तेत येऊ आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही ही यंत्रणा उभारणार असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.
This news is co provided by Janpratisadnews