*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
संभावित ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी निवड केलेल्या भारतीय संघातील खेळाडूंची नुकतीच घोषणा करण्यात आली. बी.सी.सी.आई. ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडताना काही जणांना धक्के दिले आहेत ,याचे कारण गेल्या
काही स्पर्धांमध्ये खेळाडूंची कामगिरी व ऑस्ट्रेलियातील खेळ पट्ट्या पाहून भारतीय संघातील खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील खेळाडू असे --रोहित शर्मा (कर्णधार), के .एल .राहुल (उपकर्णधार ),विराट कोहली, सूर्यकुमार यादव ,दीपक हुडा, ऋषभ पंत यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल ,अक्षर पटेल, जसप्रीत गुमराह, भुवनेश्वर कुमार हर्षल पटेल ,हर्षदीप सिंग.