जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
गेले 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्र मुसळधार पाऊस होत असल्याने, सध्याच्या परिस्थितीत धरणात प्रति सेकंद ३०,००० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरण 99 टक्के भरले आहे. सदरहू धरणातील पाण्याचा साठा नियंत्रित करण्यासाठी ,धरणाचे दरवाजे सुमारे ४.५ फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग तसेच पायथा वीज ग्राहतून पाण्याचा विसर्ग, कोयना- कृष्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. एकूण कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कोयना- कृष्णा नदी पात्रात ४२३३१ क्युसेक प्रति सेकंद इतका सुरू असून, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने ,कोयना नदीवरील बंधारेपाण्याखाली गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी रात्री १० वाजता १ फुटावर स्थिर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे, ३ फुटापर्यंत उघडण्यात आले होते परंतु धरणातील पाण्याच साठा नियंत्रित करण्यासाठी, शुक्रवारी सकाळी १० वाजता दरवाजे ४.५ फुटाने उचलण्यात आले .पायथा वीज गृहातून १०५० क्युसेक प्रतिसेकंद व धरणाच्या वक्र दरवाजातून ४१२८१क्युसेक प्रतिसेकंद असा एकूण ४२३३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना- कृष्णा नदीपात्रात करण्यात आलेला आहे. पुढील काही तास, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची परिस्थिती बघून, पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.