*रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगेबाबा महाराज कॉलेज कराड मधील भौतिकशास्त्र विभागास जर्मन पेटंट प्राप्त झाले .-----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगेबाबा महाराज कॉलेज मधील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब, भौतिकशास्त्र विभागातील विभाग प्रमुख प्रा.डॉ. जयवंत थोरात सर, सहाय्यक प्राध्यापक. डॉ. सुनंदा पिसाळ मॅडम व सहाय्यक प्राध्यापक डॉ इंद्रजीत ढोले सर यांना दि.१९-०९-२०२२ रोजी भौतिकशास्त्र विभागातील जर्मन पेटंट प्राप्त झालेले आहे. हे महाविद्यालय संलग्निक पेटंट आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब ,डॉ. जयवंत थोरात सर. सहप्राध्यापक डॉ. सुनंदा पिसाळ मॅडम व सहाय्यक प्राध्यापक डॉ. इंद्रजीत ढोले सर यांचे सदरहू भौतिक शास्त्रा विभागातील पेटंट प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे ,तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. रवींद्र पवार (भाऊ ), सेवक व सर्व सदस्यांच्या वतीने अभिनंदन करून, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.