*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
पूर्वीपासून भारतीयांत, लहान मुलांसाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर चा परवाना महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून रद्द करण्यात येऊन, उत्पादनावर पूर्णतः बंदी घातली आहे .राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मुंबई, पुणे नाशिक सह राज्याच्या विविध भागातून ,जॉन्सन बेबी पावडर चे नमुने गोळा केले होते व त्या सर्व नमुन्यांची चाचणी करण्यात आली असता, ही पावडर लहान मुलांच्या त्वचेसाठी वापरात येणाऱ्या उत्पादनासाठींच्या निकषांमध्ये, बसत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मुलुंड विभागात, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत होणाऱ्या पावडरच्या उत्पादनावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून घातलेल्या निर्बंधाच्या निर्णयाने, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा धक्का बसला आहे. पूर्वीपासून लहान बाळांसाठी वापरण्यात येणारी, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची पावडर, भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय होती .गेली अनेक वर्ष सदरहु जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी, भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या पावडर मध्ये शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय व हानिकारक गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने, सदरहू उत्पादन चालू ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड येथील उत्पादन कारखान्याचा ,जॉन्सन बेबी पावडर या उत्पादनाचा परवाना, कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त गौरीशंकर बायले यांनी दिली.