जनप्रतिसादन्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, नव्याने २८ जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे .यामध्ये मिरज ,पलूस, कडेगाव, जत ,आटपाडी या तालुक्यांचा समावेश असून ,एकूण जिल्ह्यातील लम्पी त्वचारोगाने लागण झालेल्या जनावरांची संख्या ही सुमारे 93 झाली आहे. जिल्ह्यातील तालुक्यात लम्पी त्वचारोगाचे प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. दरम्यान लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव हा जिल्ह्यात हळूहळू पसरत चालला असून, सुरुवातीस वाळवा तालुक्यात असलेला संसर्ग ,आता सर्वच तालुक्यात लागण झाल्याचे चित्र आहे .कवठेमंकाळ तालुक्यातील जायगव्हाण ,जत तालुक्यातील बसर्गी ,रेवनाळ, आटपाडी तालुक्यातील आटपाडी, पुजारवाडी, राजेवाडी, कुरुंदवाडी, आवळाई, कडेगाव तालुक्यातील तोंडोली, पलूस तालुक्यातील वसगडे, हजारवाडी, मिरज तालुक्यातील समडोळी, कुपवाड, सावळी आदी ठिकाणी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. १ जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी त्वचारोगाचे प्रादुर्भावावर, प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला असून, सुमारे २८,००० जनावरांचे लसीकरण केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यासाठी लम्पी त्वचारोगाच्या प्रतिबंधक लसीचे अंदाजे१,००,००० डोस उपलब्ध झाल्याचेसमजते.लम्पीत्वचारोगाच्या लागणीमुळे, वसगडे येथील एका गाईचा मृत्यू झाला असून, पलूस तालुक्यात, आज दुसरा बळी गेला आहे .लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आल्यानंतर, जलद गतीने पसरणारा रोग असून, जिल्ह्यातही बऱ्याच प्रमाणात फैलावला आहे .दरम्यान जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी त्वचारोगावर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यांमधील संक्रमण, संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक केली आहे.