जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत पडणारा पाऊस हा आणखी चार महिने पुढे लांबणार असून, तो जानेवारीअखेरपर्यंत पडत राहण्याचे दर्शवतो असा इशारा हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरण कुमार जोहरे यांनी दिला आहे. यंदाच्या वर्षीचा पाऊस हा किमान चार महिने पुढे सरकला असल्याचा प्राथमिक धक्कादायक अंदाज त्यांनी काढला आहे .सर्वसाधारणपणे ४ ऑक्टोबर नंतर *निंबोस्ट्रेट्स ढगांची निर्मिती* होण्याच्या प्रक्रियेत वाढ होऊन उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामानाशास्त्रज्ञ प्रा. किरण कुमार जोहरे यांनी दिली आहे .सर्वसाधारण पणे, जूनच्या आसपास पाऊस चालू होऊन, सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा ऋतू असतो .पण यंदा अंदाजे ४ महिने पाऊस पुढे राहील
असा अंदाज आहे. यंदाचे दसरा दिवाळीचे सणात देखील पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस काळ हा दीर्घकाळ टिकून, नैसर्गिक स्थिती कशी राहील? हे एक आव्हानात्मक असणार आहे. यंदाच्या जुलै महिन्यातील झालेला पाऊस सूर्यावरील चुंबकीय वादळामुळे झाला असून, आतापर्यंत असे मोठे चक्रीवादळ एकही यावर्षी तयार झालेली नाही, ही देखील बाब निदर्शनास आली आहे. सध्या परिस्थितीत मान्सूनच्या बदललेल्या आराखड्यात, शेतकरी व जनसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता, नव्या धोरणाचा विचार करावा लागेल असे आवाहन शास्त्रज्ञ जोहर यांनी केले. सध्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच धरणे काठोकाठ क्षमतेने भरली असून, अशा भरलेल्या धरणांच्या पुढे जानेवारी अखेरपर्यंत जर पाऊस पडत राहिला तर धरणांचा व बंधाऱ्यासाठी पाणी साठवण्याचे नियोजनाच्या धोरणात बदल करावा लागेल . सध्याच्या परिस्थितीत आतापासूनच शेतीचे नियोजन करणे शेतकऱ्यांच्यात व नागरिकांच्यात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरण जोहरे यांनी सांगितले.