नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. येत्या तीन महिन्यात कंपन्या बंपर नोकरीच्या संधी आणणार आहेत. मॅनपॉवरग्रुपने एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, भारतात ६४ टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये भरती करण्याची योजना आखत आहेत. करोनानंतर यावर्षी व्यवसाय चांगली उलाढाल असून मागणी वाढते आहे.
बाजारातील मागणी वाढल्याने कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांत आलेल्या सरकारी आकडेवारीतही याची झलक पाहायला मिळाली आहे. याचा फायदा थेट तरुणांना नोकरीसाठी होऊ शकतो.
मॅनपॉवरग्रुपच्या रिपोर्टनुसार, भारतात ६४ टक्के कंपन्या येत्या तीन महिन्यात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहेत.
करोना काळात भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मात्र आता अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. त्याशिवाय अनेक नवी धोरणं, पायभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणं आणि निर्यात वाढणं यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेले धक्के कमी होत आहेत.
अर्थव्यवस्थेत वाढ होत असताना नोकरीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत असून यामुळे तरुणांना फायदा होणार असल्याचं, रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.