*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी )*
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार व सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आज जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, स्टेशन चौक येथे माननीय पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस *बेरोजगार दिन* म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित , केक कापून, उपस्थित नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले .भारतातील युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन करोडो युवकांची, केंद्रातील भाजप सरकारने निराशा केली आहे शिवाय भरीस भर म्हणून महाराष्ट्रात नियोजित असणारा फॉक्स कॉन- वेदांत सुमारे १ लाख ५४ हजार कोटीचा प्रकल्प, गुजरातला पळविला असून, केंद्रातील भाजप सरकार मुळे जीवनावश्यक वस्तू, खाण्याचे पदार्थ, पेट्रोल, डिझेल, गॅस या सारख्या शेकडो वस्तूंच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ ही सर्वसामान्यांना जगणे मुश्किल करून टाकली आहे व अनेक युवकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत, उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत, या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून माननीय पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी विनायक हेगडे ,गॅब्रियल तिकडे ,सुमो पाटील, डॉ. शुभम जाधव, अक्षय अलकुंटे, अजित दुधाळ ,महालिंग हेगडे ,नितीन माने ,आकाराम कोळेकर, अक्षय शेळके ,अफजल मुजावर, राहुल यमगर ,आदित्य नाईक, सागर माने ,राहुल हेरोडगी, अमित पाटील ,सचिन सगरे ,अमीन शेख ,अक्षय शेंडगे ,राजू कांबळे, आमित चव्हाण, आदर्श कांबळे, रोहन भंडारे आदि पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.