जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगलीत, आज दि. 20 सप्टेंबर वार मंगळवार रोजी ,महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती विद्या चव्हाण यानी ,सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकारणी व तालुका अध्यक्ष यांच्या समवेत एक आढावा बैठक घेतली. आज झालेल्या सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीत व तालुकाध्यक्ष यांच्या समवेत आढावा बैठकीत, महिला राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाबद्दल, विविध उपक्रमाबद्दल व वेगवेगळ्या आंदोलनाबद्दल माहिती घेतल्यानंतर, त्यांनी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी ने केलेल्या कार्याची प्रशंसा करून, समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती विद्या चव्हाण यांनी एवढ्यावरच न थांबता, सामान्य जनतेच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर, सातत्याने आवाज उठवत कार्यरत रहा, संघटन वाढवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे तसेच महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांना अभिमान वाटेल असे काम झाले पाहिजे, त्या अनुषंगाने सर्व महिला कार्यकर्त्यांनी काम करा असे प्रतिपादन केले. सदरहू आढावा बैठकीच्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता मेत्रे यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सुष्मिता जाधव यांनी केले तर आभार अनिता कदम यांनी मानले .यावेळी प्रदेश सरचिटणीस सौ छाया पाटील, सांगली शहर अध्यक्ष अनिता पांगम, मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे, ज्योती अदाटे, छाया जाधव, उषा गायकवाड ,आशा पाटील ,संध्या आवळे तसेच सर्व जिल्हा महिला कार्यकारिणीच्या सदस्या व सर्व तालुका अध्यक्षा उपस्थित होत्या.