*सांगलीतील कुंडल येथे सोमवारी ता. ०३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा होणार ----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सांगली *जिल्हास्तरीय* सबज्युनियर( १४ वर्षाखालील) *तलवारबाजी* निवड चाचणी स्पर्धा सोमवार दिनांक *३ ऑक्टोबर २०२२* रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल ता. पलूस जि. सांगली या ठिकाणी जिल्हा संघटेनच्या वतीने आयोजित केले असल्याचे संघटनेचे जिल्हा सचिव डॉ शुभम जाधव यांनी सांगितले.
सदर निवड चाचणी मध्ये निवडला जाणारा संघ हा *अहमदनगर* येथे होणाऱ्या *राज्यस्तरीय तलवारबाजी* स्पर्धे मध्ये सांगली जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार आहे .तरी सदर निवड चाचणी ला ज्या खेळाडूंचा जन्म हा *०१-०१-२००३* नंतरचा आहे अश्या जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा तलवारबाजी संघटेनच्या वतीने करण्यात आले आहे .
जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिव डॉ शुभम जाधव मो. ८८५५९२२९२२ व स्पर्धा संयोजक व एन आय एस कोच आनंद साळुंखे ९६६५४८५१०० यांच्याशी खेळाडूंनी संपर्क साधावा.