*सांगली जिल्हा शहर काँग्रेसच्या व काँग्रेसच्या सेवा दलाच्या वतीने "भारत जोडो यात्रेस" पाठिंबा दर्शवण्यासाठी सांगली शहरात पदयात्रा---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*( अनिल जोशी* )
सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. या कार्यक्रमाबरोबरच देशाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी *कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा* काढलेली आहे या यात्रेला पाठिंबा म्हणून आज सांगली शहरातून काँग्रेस पक्षाच्या वतीने व सेवा दलाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. सदर कार्यक्रमास माजी मंत्री व जिल्ह्याचे युवक नेते माननीय नामदार डॉ. विश्वजीत कदम , शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील ,युवा नेते जितेश कदम, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पी. एल .रजपूत सर ,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, बाबगोंडा पाटील, विठ्ठलराव काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालन ताई मोहिते , मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय मेंढे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक सिंग ,नगरसेवक अमर निंबाळकर ,अभिजीत भोसले, तोफेक शिकलगार ,प्रतीक्षा काळे, युवक काँग्रेसचे विजय सातपुते, राजपूत ,अरुण पळसुले ,मनी नगर, माजी नगरसेवक विशाल कलगुडगी, अजित दोरकर, प्रमोद सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे सातपुते, नामदेव पठाडे, विश्वास यादव, मायाताई आरगे ,माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, सीमा कुलकर्णी, जुबेदा बिजली ,कांचन खंदारे, विटाच्या अध्यक्ष बाळासाहेब पाटील, श्रीधर बारटक्के ,जिल्हा सचिव सचिन चव्हाण, प्रकाश माने, एडवोकेट भाऊसाहेब पवार, एडवोकेट अर्जुन कोकाटे, एडवोकेट कुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव कनक ,माजी सभापती नंदाताई कोलप, रजिया अन्सारी, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी ,अत्तर पाशा पटेल, अकबर मोमीन ,खानापूरचे राजू निकम, सुरेखा जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदरचे पदयात्रा काँग्रेस भवन स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळा या मार्गाने बदाम चौक नळ भाग वेलणकर मंगल कार्यालय परत काँग्रेस भवन येथे पदयात्रा आली. यावेळी महात्मा गांधी यांना डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून, सदरची पदयात्रा काँग्रेस भवन येथे आली. काँग्रेस भवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन एडवोकेट भाऊसाहेब पवार व मालन ताई मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.