*सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे महापौर यांच्यातील आपापसातील वादाने तणावपूर्ण वातावरणात महासभा संपन्न---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेच्या दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे महापौरच एकमेकांसमोर उभा ठाकल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना सभागृहात, राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सभागृहाबाहेर उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या वर प्रश्नचिन्ह उभा करून, नगरसेवकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांना बोलावले का? असा आरोप महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या पिठासमोर पिठासना जवळ जाऊन, नगरसेवकांना पोलिसांची भीती दाखवता का ?असा प्रतिप्रश्न जाबही नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला. महापालिकेच्या सभागृहातील पिठासनाजवळ असणाऱ्या राजदंडालाही उचलून हात घालण्याचा प्रयत्नही नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मिरजेतील ड्रेनेजच्या प्रलंबित कामाच्या विषयासंबंधी नागरिकांनी नगरसेवकांच्या फोटो ना काही दिवसापूर्वी चपलांचा हार घातला होता. यावरून संतप्त झालेल्या नगरसेवक थोरात यांनी आज चपलांचा हार सभागृहात आणून थेट महापौरांना दाखवला व याहारांचा मानकरी कोण? असा प्रति प्रश्नही केला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. सदर वेळी सभागृहातील जेष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. सुमारे दोन अडीच तास ही वादळी चर्चा सुरू होती. त्यामुळे महापालिकेची आजची बुधवारची सभा वादळी झाली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोबो यंत्रणा लवकरच महापालिकेच्या स्वच्छतेच्या यंत्रणेचा भाग होणार आहे .सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत, जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून, अत्याधुनिक ड्रेनेजच्या स्वच्छतेच्या रोबोयंत्रणेसाठी, रोबो खरेदीसाठी ३९ लाख ५२ हजार रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. ड्रेनेज स्वच्छतेसाठी सदरहू अत्याधुनिक रोबोच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या असून महापालिका आयुक्त सुनील पवार महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ड्रेनेज स्वच्छतेची अत्याधुनिक रोबोयंत्रणेची चाचणी घेऊन चेंबरमधील गाळ अवघ्या पंधरा मिनिटात काढला गेला आहे.