*सांगलीसह महाराष्ट्र राज्यात, किमान तापमानात 2 अंशांनी घट होऊन गारठा वाढला. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सध्या सांगलीसह राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना, दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंश तापमानात घट होऊन, थंडीमध्ये चांगल्याच प्रमाणात वाढ होत आहे. *उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवातामुळे अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने,* राज्यातील तापमान बऱ्याच अंशाने घट होण्याची शक्यता दर्शवत आहे. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमानाची स्थिती 12 अंश ते 13 अंशाच्या खाली गेल्याने, कडाक्याची थंडी पडली आहे. सांगली शहरांमध्ये नागरिक व्यायामासाठी सकाळी बाहेर पडून थंडीचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक मधील किमान तापमान 10.4 अंशाच्या खाली आले असून, त्याबरोबरच महाबळेश्वर येथील तापमान बऱ्याच प्रमाणात घट झाल्याने, हिवाळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. महाराष्ट्र राज्यातील आजच्या तापमानात धुळे जिल्ह्यात निश्चांकी तापमानाची नोंद झाली असून जवळपास 7 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरले आहे. राज्यातील दिवसेंदिवस तापमानात घट होऊन, थंडी बऱ्याच प्रमाणात वाढत असल्याने, नागरिकांनी *उबदार स्वेटर, लोकरीचे कपडे* यांचा वापर करून आपला बचाव करावा लागे पुढील चित्र दिसत आहे. महाराष्ट्र राज्यातील तापमान विशेषत्वे करून दोन- चार दिवसांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता असून, कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे .उत्तरेकडील वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे तीन- चार दिवसापासून तापमानात बऱ्याच अंशी घट दर्शवत आहे. *सांगलीतही संध्याकाळी पासून सकाळपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत असून* , सकाळच्या वेळेस रस्त्यावर व्यायामासाठी फिरणारे तरुण व नागरिक दिसत आहेत.