*सांगलीतून मुंबई वरील 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या शहीद पोलिसांना अभिवादन करण्यासाठी, सांगली ते मुंबई दौड सुरू---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीतून आज, मुंबईवरील 26/ 11 ला यापूर्वी जो दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना अभिवादन करण्यासाठी ,सांगली ते मुंबई दौडीचे आयोजन करून, नुकतीच दौडीला सुरुवात झाली आहे .मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना अभिवादन करण्यासाठी दौड दिनांक 22 नोव्हेंबर 2022 सांगलीतून निघून , 26 नोव्हेंबर 2022 ला मुंबईला पोहोचेल. सदरहु दौडीचे आयोजन, शहीद अशोक कामटे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे
.सांगली मधील शहीद अशोक कामटे फाउंडेशन च्या वतीने शहिदांना अभिवादन करण्यासाठी, गेले बारा वर्षापासून सांगलीमध्ये इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. सांगलीतून मुंबईला जाणाऱ्या दौडीसाठी, 25 धावपटू सहभागी झाले असून, सुमारे 470 किलोमीटरच्या प्रवासाची ही दौड आहे. सांगलीतून निघालेली ही दौड इस्लामपूर- कराड -सातारा- पुणे- लोणावळा -खंडाळा -खोपोली- पनवेल -नवी मुंबई या मार्गे निघून, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी 26 नोव्हेंबर रोजी पोहोचत आहे. भारत देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या परिक्रमाची गाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी या दौडीचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.