*सांगलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन.----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सांगलीत महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या *शिंदे फडणवीस* सरकारच्या विरोधात " *उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला,"* या राज्यव्यापी आंदोलन धोरणाच्या पार्श्वभूमीवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील साहेब व युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या सूचनेनुसार व शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने हे निषेध आंदोलन सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय आर .आय .टी. येथे करण्यात आले.यावेळी युवक राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे,सेवादल शहर-जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,आशुतोष धोतरे,अक्षय अलकुंटे,सुमुख पाटील, प्रफुल्ल जाधव,धर्मेंद्र कोळी,अरूण चव्हाण, सुशांत काळे,राहुल यमगर,आदर्श कांबळे,सचिन सगरे, अमिन शेख,आदित्य नाईक, अमित चव्हाण, राजू कांबळे,राहील मुल्ला, वाजिद खतीब यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी सेवादल,कामगार सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.