*सांगली : उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व मिटकॉन आयोजित अनुसूचित प्रवर्गासाठी मोफत निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत* अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निशुल्क / मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (REDP) दि.14 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2022 या कालावधीत सोलापूर येथे घेण्यात येणार आहे. प्राप्त अर्जातून ,निवड समिती मार्फत दि.11 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखतीद्वारे 20 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे . निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, प्रशिक्षणार्थाची चहा, नाष्टा, भोजन व निवास व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल .
निवड झालेल्या उमेदवारांना शासकिय विविध कर्ज योजना-सोयी सवलती आणि कार्य-प्रणाली, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, उद्योग संबधित कायदे, उद्योजकिय व्यक्तिमत्व विकास व सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किमती व हिशोब पध्दती, प्रकल्प अहवाल, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजीटल मार्केटिंग तसेच उद्योग वित्तिय व्यवस्थापन याबाबत शासकिय अधिकारी व तज्ञामार्फत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यकमात भाग घेण्यासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान ७ वी पास, महाराष्ट्राचा किमान १५ वर्षापासून चा रहिवाशी, उद्योग करण्याची प्रबळ इच्छा व १८ ते ५० वर्षे वयोगटातील असावा . तरी इच्छुक अनुसुचित नव उद्योजक युवक- युवतीनी, *मुख्य व्यवस्थापक,मिटकॉन द्वारा जिल्हा उद्योग केंद्र ,* उद्योग भवन,टाटा पेट्रोल पम्प मागे सांगली, 7588626953 अथवा श्री.राज कलाल 9595252481/ 8888142757 येथे संपर्क साधावा.