*कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांनी भगवान दत्तात्रयांचे घेतले दर्शन--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
कोल्हापुर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती या सोमवारी देवदत्त दर्शनासाठी आल्या होत्या. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व उद्योग जगतामध्ये ख्याती असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांनी कोणताही भेदभाव न करता, सामान्य भक्तांप्रमाणे रांगेत उभारून, देव दर्शन घेतले. नुकतेच भारतीय वंशाचे असलेले, ब्रिटिश पंतप्रधानपदी आरुढ झालेले ,ऋषी सूनक यांच्या त्या सासू आहेत. एवढे असूनही कोणत्याही शासकीय सुरक्षाविना येऊन, सामान्य भक्तांच्या प्रमाणे, श्री दत्त महाराजांचे अभिषेक, पूजा, अर्चना करून दत्त दर्शनघेऊनप्रार्थनाकेली.श्री.नृसिंहवाडी दत्त देव संस्थानच्यावतीने ,त्यांना प्रसादाच्या स्वरूपात, दत्तप्रतिमा व शाल देऊन ,आशीर्वाद देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी मधील दत्त दर्शनासाठी येऊन, इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांनी, जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदरहू इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांच्या आशीर्वचन सत्कार समारंभात, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ ,दत्त देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे, पुजारी विश्वस्त संतोष खोंबारे ,संजय पुजारी, वैभव पुजारी, इतर पुजारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.