*सांगलीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याने आंदोलन --*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी* )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.मा.खा.सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , सांगली शहराध्यक्ष सागर घोडके ,महिला अध्यक्ष अनिता पांगम , मिरज महिला अध्यक्षा वंदना चंदनशिवे अध्यक्षा वंदना चंदनशिवे ,छाया जाधव , आयुब बारगिर ,बिरेंद्र थोरात , धनंजय पाटील , उत्तम कांबळे ,डॉ शुभम जाधव ,अजित दुधाळ , अमृता चोपडे , संगीता जाधव , उषा गायकवाड , बाळू गोंधळे , डॉ सतीश नाईक , विद्या कांबळे , सुरेखा सातपुते , सुरेखा हेगडे ,वैशाली कळके , युसूफ जमादार ,सुनील भोसले , इर्शाद पखाली , अमित पाटील , रामभाऊ पाटील ,आदित्य नाईक , महालिंग हेगडे , रवींद्र नाईक नितीन माने , राहुल हिरोडगी , राजू कांबळे ,अभिजित रांजणे , आशुतोष धोतरे , युवराज नायकवाडे ,मालिकार्जुन मजगे , अभिजित रांजणे ,विनायक बलालदार , जुबेर मुजावर , दत्ता पाटील , आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.