*कोल्हापूरच्या दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून, आज दुपारी त्यांचे पुण्याहून कोल्हापूरला आगमन होईल .गेल्या पाच वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा हा प्रथमच होत आहे .त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकर वासियांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना, पंढरपुरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ ही विश्रामगृहावर भेटणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या 30 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 रोजी नियोजित सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान पदाधिकाऱ्यांशी ,कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी भावी राजकीय परिस्थिती व रणनीती विषयी संवाद साधून चर्चा करणार आहेत.