*सांगलीतील कासेगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने दोन गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमास अटक --*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीतील कासेगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. त्याचे नाव प्रवीण खाशाबा जाधव वय वर्षे 37 राहणार कराड जिल्हा सातारा असे आहे. त्याच्याकडून सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारे 81 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे .सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास दिले होते. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक सध्या कार्यरत आहे. कासेगाव येथे एक इसम स्वतः जवळच्या पिशवीत पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकातील अंमलदार दीपक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार एक संशयित इसम अष्टविनायक फॅब्रिकेटर्स च्या परिसरात पिशवीसह संशयास्पदरित्या आढळून आला. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवला असता, त्याच्याकडे पिशवीत दोन गावठी पिस्तुले व पाच जिवंत काडतुसे असे एकूण 81 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. भारतीय हत्यार अधिनियम कलम 1959 चे आर्म अॅक्ट 3, 25 नुसार कासेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून, सदरहू प्रवीण खाशाबा जाधव राहणार कराड जिल्हा सातारा यास अटक करण्यात आलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, दीपक गायकवाड ,आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, हेमंत ओमासे, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सचिन धोत्रे ,सुधीर गोरे, कॅप्टन गुंडवाडे आदींनी कारवाई भाग घेतला.