पुण्यात"गुन्हेगारी मुक्ती" साठी जनजागृती मोहीम.
- समाजसेवक तुकाराम नावलगी संस्था नेसरी व अर्धसैनिक ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम.
कोल्हापूर/पुणे : मिलिंद पाटील.
समाजसेवक तुकाराम नावलगी संस्था नेसरी व अर्धसैनिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०४/११/२०२२ रोजी स्वारगेट डेक्कन पुणे स्टेशन येथे "गुन्हेगारी मुक्तीसाठी" जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
वाढती गुन्हेगारी युवा वर्गाचे भविष्य बिघडवत आहे. यामुळे बाल वयातच गुन्हेगारीकडे वाढता कल झाला असल्याचे पोलीस रेकॉर्ड वरून निदर्शनास आले आहे. यामुळे भविष्यात सामाजिक संतुलन बिघडून अराजकता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आपल्या संस्कृतीवर याचा वाईट परिणाम होत असून समाज व्यवस्था बिघडत आहे. समाज व्यवस्था सक्षम करण्यासाठी व आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी तसेच युवा पिढी सक्षम करण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्यात "गुन्हेगारी मुक्ती" मोहीम राबविण्यात आली असल्याचे यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जनजागृती पर संदेश देणारे फलक झळकवण्यात आले. आणि गुन्हेगारी रोखण्या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
या समाज प्रबोधन पर मोहीमेची स्वारगेट डेक्कन पुणे स्टेशन परिसरातील नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी नरसु शिंदे, सदस्य जयवंत कांबळे, मारुती पाटील, सर्जेराव भरणकर, यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.