*कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात, सलग दुसऱ्या दिवशी किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांचा देवीच्या गळ्यापर्यंत स्पर्श--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे, आज दुसऱ्या दिवशी मावळतीच्या किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांनी, श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत स्पर्श झाला .दरवर्षी कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सवाचा सोहळा होत असतो. सुरुवातीस किरणोत्सवाची सोनेरी किरणे श्री. अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या पदकमलना स्पर्श करून, दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर किरणोत्सवाची सोनेरी किरणे पोहोचत असतात. आज कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात सूर्यकिरणांनी सायंकाळी ०५ वाजून ०१ मिनिटांनी प्रवेश करून, ०५ वाजून ४४ मिनिटांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या पदकमलांना स्पर्श झाला. त्यानंतर ०५ वाजून ४६ मिनिटांनी किरणोत्सवाच्या सोनेरी किरणांनी ,कमरेला स्पर्श करत ०५ वाजून ४८ मिनिटांनी, किरणोत्सवाची सोनेरी किरणानी, श्री. अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श करून लुप्त झाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्रकाशोत्सवाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर, करवीर निवासिनी श्री .अंबाबाई देवीची आरती करून, अलंकारिक पूजा बांधण्यात येते. कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर समितीने मंदिराच्या आवारात सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित केली असून, याचे थेट प्रक्षेपण मोठ्या तीन एलइडी स्क्रीनवर करण्यात आले होते.