*सांगली- राज्यातील सर्व कलाकारांना शासनाच्या माध्यमातून , सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहू:- राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल)* *नितीन करीर यांचे प्रतिपादन.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, सांगली यांच्या वतीने सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या, विविध कलाकार ,रंगकर्मीना बुधवारी सन्मानित करण्यात आले होते. यंदाच्या वर्षीचा काकासाहेब खाडीलकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक, आचार्य अत्रे प्रतिभा रंग पुरस्कार साहित्यिक सदानंद कदम ,नाना ताडे नाट्यस्वर पुरस्कार जेष्ठ तबलावादक राजेंद्र कानिटकर, श्रीनिवास शिंदगी रंगभूमी पुरस्कार सुरेश कोरे, अण्णासाहेब पाटील नाट्य तंत्र पुरस्कार दिग्दर्शक व अभिनेता प्रताप सोनाळे, दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार लेखक ऋषिकेश तुराई यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे नाटक, चित्रपट मालिकांसाठी कपडे वगैरे साहित्य पुरवणारे कुलकर्णी नाट्य विश्व या संस्थेला *विशेष सन्मान पुरस्कार* देऊन गौरवण्यात आले.
राज्य नाट्य स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या कलाकारांना दिला जाणारा डाॅ. मधु आपटे कलावंत पुरस्कार यशोधन गडकरी, भाग्यश्री तांबेवेकर ,अश्विनी खाडीलकर यांना देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले .
महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांच्या हस्ते ,लोक साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर लिखित नाट्य क्रांतिकारक *विष्णुदास भावे* या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले .सध्याच्या नव्या पिढीला विष्णुदास भावे यांची ओळख या ग्रंथाच्या प्रकाशनाने होणार आहे. सांगलीचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी नाटककार विष्णुदास भावे यांना *राजाश्रय* दिला होता, त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून कलाकारांना विविध योजना मार्फत योग्य लाभ मिळवून देऊ असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांनी केले
. सदरहू कार्यक्रमास नगरसेविका भारती दिगडे ,डॉ. शरद कराळे, वामन पंडित, समीक्षक प्रसाद घाणेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कुलकर्णी यांनी केले. सुरुवातीचे कार्यक्रमाचे स्वागत मुकुंद पटवर्धन यांनी केले. शेवटी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल उपस्थितांचे भालचंद्र चितळे यांनी आभार मानले.