*मतदार जागृतीबाबत सायकल रॅली संपन्न.*
कोल्हापूर प्रतिनिधी: मयूर कांदळकर
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधीष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ.एम.एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणुक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ.प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारत पासून सुरुवात ते सायबर चौक ते माऊली चौक त्यानंतर सम्राट नगर त्यानंतर एनसीसी भवन शिवाजी युनिव्हर्सिटी गेट, समारोप - शिवाजी विद्यापीठाचे जिजामाता सभागृह या मार्गाने रॅली मार्गस्थ झाली
. रॅलीत सहभागी विद्यार्थी/नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.