*सांगलीत आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना, सांगली जिल्हा बहुउद्देशीय चर्मकार समाजाच्या वतीने "रोहिदास भवन" बांधण्यासाठी निवेदन--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीत आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे सांगली दौऱ्यावर आले असता, त्यांना भेटून भाजपा आ.जा. मोर्चातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच आपल्या सांगली जिल्ह्यात बहुउद्देशीय चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या, संत गुरु रोहिदास महाराजांच्या नावाने " *रोहिदास भवन* " बांधणी करता जागा उपलब्ध करून द्यावी तसेच *साहित्यरत्न अण्णासाहेब साठे* यांच्या पुतळ्यासंबंधी प्रलंबित असलेले शासन दरबारातील प्रश्न, लवकरात लवकर सोडवणेसाठी प्रयत्न करावा यासाठी एक निवेदन मार्गदर्शक मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष आनंदराव सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, मंडलाध्यक्ष विकास आवळे, गुरु रोहिदास फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल दादा भोसले आदी पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित होते. सदरहू समाजाच्या निवेदनातील मागण्याबाबत जातीने लक्ष घालून, समाजाचे प्रश्न शासन स्तरावर लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.