*महाराष्ट्र राज्यात गोवर रोगाच्या प्रादुर्भावावर 15 डिसेंबर पासून लसीकरण अभियानाची सुरुवात-*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील गोवर रोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रण मिळवण्यासाठी गठीत केलेल्या राज्यकृती दलाकडून प्रतिबंधात्मक उपायोजनेसह लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. गोवर रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक पहिल्या टप्प्यातील उपाय योजनेसाठी मुख्यत्वे करून लसीकरणावर भर देण्यात येणार असून, 9 महिने ते 5 वर्षे वयोवर्षे गटातील लशीची एकही मात्रा न घेतलेल्या बालकांच्या कडे, विशेषत्वाने लक्ष देऊन लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृती दलाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी सदर गोवर प्रतिबंधक लसीकरण अभियान दोन टप्प्यात राबवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सर्व बालकांना 15 ते 30 डिसेंबर पर्यंत लसीकरणाचा पहिला डोस, त्यानंतर 15 ते 26 जानेवारी पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. राज्यात गोवर रोगाच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी गोवर रूबेला ची एकही लशीची मात्रा न घेतलेल्या, 9 महिने ते 5 वर्षे पर्यंतच्या सर्व बालकांच्या लसीकरणावर प्राधान्याने अग्रक्रम देण्यात येईल. त्याबरोबरच राज्यातील सर्व बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रथम नोंदणी अभियान देखील राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या जवळपास 2.5 लाख बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या गोवर प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर ,चार आठवड्यानंतर म्हणजेच 15 ते 25 जानेवारी पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोस देऊन, 26 जानेवारी 2023 पर्यंत गोवर प्रतिबंधक लसीकरणाचे अभियान पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष साळुंखे यांनी केली आहे.