*महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून नागपूर मध्ये होणार* ---
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 19 डिसेंबर 2022 पासून, नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच कोरोना नंतर नागपूरला अधिवेशन होत आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी, काल मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या नागपूर मध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी, निवास व्यवस्था स्वच्छता, आहार ,वायफाय यंत्रणा, प्रसार माध्यमांच्या यंत्रणेंसाठी व्यवस्था आदी सर्व गोष्टींच्या बाबींचा सविस्तर चर्चा झाली. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या दिवाळी अधिवेशनाच्या काळात ,राज्य शासनाने केलेल्या अद्यावत व्यवस्थेची माहिती, एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी, मोबाईलचे एक ॲप तयार करण्यात यावे असे आदेश सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.