*राजस्थानमध्ये पोहोचलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" यात्रेत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी.--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सध्या राजस्थान मध्ये प्रवेश केलेल्या, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" यात्रेत, सवाई माधवपुर येथील भदाैती येथे, रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची "भारत जोडो" यात्रा सध्या राजस्थान मधून जात आहे. राजस्थान मधील यात्रेचा आजचा मुक्काम हा बिलोना कलान येथे असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यात्रेतील उपस्थिती नंतर, माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. भारत देशाला एकत्र आणण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधीजी यांच्या चालू असलेल्या" भारत जोडो" यात्रेत, लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली दिसत आहे असून, भविष्यकाळात आपण यशस्वी होऊ हे भारत जोडो यात्रा दर्शवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सध्या राजस्थान मधून जात असलेल्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची "भारत जोडो" यात्रा, आज राजस्थान मधील भदौती येथे आली असता, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सहभागी झाले. त्यांच्या यात्रेतील सहभागानंतर राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना माध्यमात महत्व प्राप्त झाले आहे.