*सांगलीत आज सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व इतर व्यक्तींनी केलेल्या बेताल वक्तव्यांच्या निषेधार्थ, जोडे मार व ठिय्या आंदोलन-----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगली जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने , महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व इतर व्यक्तींच्या जातीयवादी, बेताल केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ आज, पुष्पराज चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ, जोडे मार व ठिय्या आंदोलन करण्यात आले. सदरहू आंदोलनाच्या वेळी, सांगली जिल्हा शहर काँग्रेस (आय))चे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मार्गदर्शन केले. गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात, राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून आंदोलने व पडसाद उमटत आहेत. आज झालेल्या आंदोलनात, सांगली जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना तसेच सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, एडवोकेट के .डी. शिंदे, डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक दादासाहेब ढेरे, प्राचार्य गायकवाड, सुरेश दुधगावकर, प्रमोद कुदळे, किरणराज कांबळे, नितीन गोंधळे, प्रवीण शिंदे ,किरण कांबळे आदी मान्यवर व सर्व संघटनांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.