*महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील औषध पुरवठा यंत्रणा सपशेल नाकाम, खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी उस्मानाबाद मध्ये अनुभवला प्रसंग---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागात, सर्वसामान्य नागरिकांना औषध पुरवठ्यामध्ये अनेक अडचणींचा व समस्यांचा, अनेक ठिकाणी सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना औषध पुरवण्याच्या बाबतीत आरोग्य यंत्रणा सपशेल नाकामी ठरल्याचा अनुभव, खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नुकताच उस्मानाबाद दौऱ्यात आला. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील औषध घेणाऱ्या रुग्णांच्या रांगेत ,खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ह्या उभारल्या होत्या व तेथील सामान्य नागरिकांना औषधांच्या पुरवठ्याची किती भयानक स्थिती आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. नुकताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य विषयक विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता, खुद्द त्यांना, सामान्य रुग्णांच्या नागरिकांना येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा व अडचणीच्या परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागला. जिल्हा रुग्णालयाने जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे जिल्हा रुग्णालयातील बऱ्याच रुग्णांनी, आम्हाला औषधे मिळत नसल्याची व ती बाहेरून घ्या असे कर्मचारी सांगत असल्याची तक्रार केली. खुद्द तक्रारीची खातर जमा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या स्वतः रांगेत उभारून ,औषध घेण्यासाठी थांबल्या असता, संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले, शिवाय रुग्णालयातील नाव नोंदणी विभागातील कर्मचारी हजर नसल्यामुळे रुग्णांची रांग बघून, परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना बोलवून याबाबतीत कडक शब्दात समज दिली. खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्या स्वतः रुग्णांच्या रांगेत उभारल्यामुळे, प्रशासन अक्षरशः भांबावलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले.