*महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षी थंडीचा प्रभाव जास्त राहणार असल्याचे प्रतिपादन ---हवामान अंदाज विभाग प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षी थंडीचा प्रभाव हा जास्तीत जास्त असणारा असल्याचे भाकीत हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी केले आहे. सध्या यंदाच्या वर्षीच्या हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, सर्वसाधारणपणे फेब्रुवारीच्या हंगामा मध्ये दक्षिणेकडील राज्यात, मध्य- भारत तसेच भारताच्या इतर काही भागात, किमान तापमान सरासरी तापमानाच्या पेक्षा कमी राहण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण जास्तीत जास्त असेल असे वाटत आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यात तसेच उत्तर -पश्चिम भागात थंडीचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात आज थंडीचा प्रभाव पुन्हा वाढत चालला असून, सर्वात कमी तापमान औरंगाबाद येथे दहा 10.8 अंश सेल्सिअस इतके उतरले असून, पुण्यातही थंडी वाढली आहे. सध्या पुण्याला शहराचा पारा 11.9 अंश सेल्सिअस इतक्या प्रमाणात घसरला आहे. बंगालच्या सागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील थंडीचे तापमान, शुक्रवार नंतर चार-पाच दिवस कमी होऊन, त्यानंतर पुन्हा किमान तापमानात घट होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल असे हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी सांगितले आहे.