*महाराष्ट्र राज्यातील सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून ,बांधकाम खर्चातही वाढ होण्याची चिन्हे--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सध्या महाराष्ट्र राज्यात ओनरशिप अपार्टमेंट कन्स्ट्रक्शनची कामे व विविध उद्योगांची कामे मोठ्या प्रमाणात चालू असून, यातील महत्त्वाचा घटक असलेल्या सिमेंटच्या दरात, लवकरच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. सिमेंट कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पूर्ण देशात प्रति पोत्यामागे 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची चिन्हे असून, त्यामुळे बांधकाम तसेच नूतनीकरण कामासाठी सुद्धा यापुढे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील असे दिसत आहे. यंदाच्या वर्षी सिमेंट उद्योगात चांगली तेजी राहणार असून, आर्थिक वर्ष 2022 ते 2023 मध्ये तिसऱ्या तीमही मध्ये, सिमेंटचे दर वाढण्याचे संकेत एम. के. ग्लोबल कंपनीने दिले आहेत. सध्या भारतीय बाजारामध्ये आदित्य बिर्ला, अल्ट्राटेक, ए.सी. सी. सिमेंट ह्या मोठ्या कंपन्या असून, अल्ट्राटेक कंपनीची दरवर्षी सुमारे 117 दशलक्ष सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. ए.सी.सी. सिमेंट व अंबुजा सिमेंट या कंपन्या, अदानी समूहाने खरेदी केल्या असून, सिमेंटच्या उत्पादनाच्या युगात ए.सी.सी. सिमेंटचा देखील मोठ्या प्रमाणात वाटा आहे .अदानी समूह समूहाने या दोन खरेदी केलेल्या कंपन्यांची सिमेंटची उत्पादन क्षमता 675 लाख टन इतकी आहे.