*सांगली जिल्ह्यातील काँग्रेस भवनात जिल्ह्याचे लोकप्रिय माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन सांगली येथे सकाळी 11 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला, यावेळी बोलताना मध्यवर्ती बँकेचे माझी अध्यक्ष माननीय महावीर कागवाडे यांनी बोलताना मदन भाऊ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुवत निर्माण करण्याचे काम केले. सर्व सामान्य कार्यकर्त्याला महत्त्वाची पदे देऊन ,त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम मदन भाऊ पाटील यांनी केले .यावेळी जिल्हा सरचिटणीस व मार्केट कमिटी माजी सभापती सुभाष खोत यानी बोलताना स्वर्गीय मदन भाऊ पाटील हे कार्यकर्ते तयार करणारा कारखाना होता. कार्यकर्त्याची विचारपूस करणारा नेता होता .आज अशा नेत्याची गरज या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. राहुल जी गांधी यांनी भारत जोडो अभियान चालू करून, देशांमध्ये सर्व जाती धर्मातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याला जोडण्यासाठी, जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हा जोडो अभियान राबवावे तरच जिल्हा एक संघ होईल. काँग्रेसला बळकट करू तसेच काँग्रेस बळकट होईल असे त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन ताई मोहिते यांनीही मदन भाऊ पाटील यांच्या बद्दल त्यांचे जे अनुभव सांगून, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले व शेवटी आभार ओबीसीचे अशोक सिंग रजपूत यांनी मानले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉ. सिकंदर जमादार, सेवा दलाचे पैगंबर शेख, समाज कल्याणच्या माजी सभापती नंदा देवी कॉलप, मदन भाऊ मंचचे आनंदा लेंगरे व त्यांचे सर्व सहकारी, वक्त सेल चे दयानंद जम्बगी ,सेवा दलाचे पैगंबर शेख, श्रीधर बारटक्के, विठ्ठलराव काळे, कार्याध्यक्ष अरुण पळसुले ,सीमा कुलकर्णी, प्रतीक्षा काळे, विठ्ठलराव काळे ,शिवाजी सावंत, विश्वास यादव ,नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील ,सुभाष पट्टणशेट्टी, सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.