*बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना, त्यांची कन्या रोहिणी हिने दिलेल्या किडनी दानाने पुनर्जन्म प्राप्त--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना त्यांची कन्या रोहिणी यांनी किडनी दान करून, एक पुनर्जन्म दिला आहे. स्वतः बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी, आपली मुलगी रोहिणी हिने दिलेल्या किडनी दानाच्या, धाडसाच्या, त्यागाच्या व जिद्दी विषयी बोलण्यास मजजवळ शब्दच उरले नसल्याचे सांगून, पुढील भावी तरुण पिढीस प्रेरणास्त्रोत राहील असे सांगितले.
एमबीबीएस पदवीधारक लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांना तीन लहान मुले आहेत, त्यांचे पती समरेश सिंग सिंगापूरमधील एव्हरकोर पार्टनर्स या मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
अशा परिस्थितीत 75 वर्षांच्या आपल्या जीर्ण झालेल्या वडिलांना कोणी आपली किडनी दिली तर ? हे धाडस फक्त मुलीच करू शकतात.
रोहिणी म्हणाली, "मी पप्पांसाठी काहीही करू शकते, मी सध्या फक्त माझ्या शरीराचे मांस देत आहे." आपल्या मुलीच्या धाडस आणि जिद्दीपुढे लालू प्रसाद यादव हरले.
खरे तर मुली असताना पुत्राच्या हव्यासापोटी मुले जन्माला घालणार्यांसाठी हा धडा आहे की मुलीच जास्त विश्वासार्ह असतात, मुलीला परके समजणे हा मूर्खपणाआहे.
वडिलांना दुसरा जन्म दिल्याबद्दल रोहिणी आचार्य यांचे अभिनंदन. जगातील सर्व मुलींना तुमचा अभिमान असेल.
रोहिणी आचार्य, नवीन पिढीतील सर्व तरुणांसाठी तुम्ही सदैव प्रेरणास्रोत राहाल. पुढील भावी तरुण पिढीस प्रेरणास्त्रोत ठरलेल्या रोहिणी आचार्य यांना त्रिवार सलाम.