*सांगलीतील वाळव्यामध्ये लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिका सेवा प्रदान समारंभ संपन्न ---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीतील वाळव्यामध्ये लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्यावतीने, आज रुग्णवाहिका सेवा प्रदान करण्याचा समारंभ संपन्न झाला. रुग्णवाहिका सेवा प्रदान समारंभ ज्येष्ठ पत्रकार धन्वंतरी परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्यावतीने आज पर्यंत बरेच समाजपयोगी कार्यक्रम शिबिरे घेण्यात येतात. लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिका सेवा प्रदान समारंभास, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार शेळके, श्रीमती कुंदाताई शेळके, जगदीश अहिर, पत्रकार महादेव अहिर ,बजरंग अहिर ,संजय माळी, संभाजी डवंग, मधुकर महाजन, मारुती शेळके, संजय हवालदार, सुधीर अहिर, केशव अहिर, पतंग शेळके ,गोपी नांदणीकर ,योगेश अहिर, संजय नायकवडी ,संजय मुळीक, संभाजी जाधव ,प्राध्यापक डॉक्टर पुनम शेळके, सौ. पल्लवी अहिर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्यावतीने झालेल्या रुग्णवाहिका सेवा प्रदान समारंभाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोककल्याणार्थ गरीब जनतेसाठी, लोकनेते दत्ता दादा शेळके प्रतिष्ठानच्यावतीने बरेच कार्यक्रम शिबिरे राबवण्यात येत असतात.