पत्रकार शशिकांत वारीशे त्यांचे खून की अपघात. युवा पत्रकार संघाच्या वतीने चौकशी संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन..
कोल्हापूर प्रतिनिधी :मिलिंद पाटील.
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तापास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आज निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार शशीकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांनी शशिकांत यांचा खूनच झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे.आम्हाला मिळालेल्या माहिती प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदि, व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनर वर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो" अशा आशयाची ती बातमी होती.. बातमीचे कात्रण ही वारीशे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात हि बातमी दिलेली होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र कार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीशे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. सकाळीच त्यांचे निधन झाले.
त्यानुसार पत्रकार संरक्षण कायदा प्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, तात्काळ शासनाकडून पत्रकार वारीशे यांचे कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाखाची मदत देऊन कुटुंबीयांना आधार द्यावा चौकशी अंती कुटुंबातील एका व्यक्तींला शासन स्तरावर नोकरीवर घ्यावे अशी आमची मागणी आहे.
या घटनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली असून युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आम्ही निषेध नोंदवत आहे.युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाद्वारे मागणीचे निवेदन मा.भगवान कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे देण्यात आले. निवेदनावर शिष्टमंडळाच्या सह्या आहेत.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शरद माळी,
राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.