मेकॅनिक्सना अत्याधुनिक प्रशिक्षणाची गरज तसेच काळा बरोबर मेकॅनिक बदलला पाहिजे- प्रा. पाटणकर यांचे प्रतिपादन..!
- पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटक मधील हजारो मॅकेनिकसाठी टू व्हिलर मेकॅनिक्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय कार्यशाळा कोल्हापूर मध्ये संपन्न.
कोल्हापूर (प्रतिनिधी) -: अन्सार मुल्ला.
देशासह राज्यात रोज होणारे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात पाहता वाहन सुरक्षित ठेवणे , वापरणे याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे . दुचाकी वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञानात बदल होणार आहेत . अत्याधुनिक प्रशिक्षणाची मेकॅनिक्सना गरज असून स्पर्धेत टिकण्यासाठी ते आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के .जी . पाटील यांनी केले .प्रयोग सोशल फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ' मेकॅनिक , व्यवसाय आणि भविष्य ' या विषयावर दुचाकी मेकॅनिक्सची राज्यस्तरीय कार्यशाळा केशवराव भोसले नाट्यगृह येथे घेण्यात आली . याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .
यावेळी न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ .संजय दाभोळे म्हणाले , स्पर्धेच्या काळात वाहन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे .त्यानुसार ग्राहकाभिमुख सेवा देताना मेकॅनिक्सनी गुणवत्ता टिकवून व्यवसाय वृद्धिंगत करावा . प्रशिक्षक प्रा.वैभव पाटणकर म्हणाले , प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दुचाकींमध्ये भारत सरकार आमूलाग्र बदल करीत आहे . त्यानुसार दुचाकी मेकॅनिक्सने काळानुसार बदलून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे . कार्यक्रमात दुचाकी वाहन वापर व सुरक्षिततेबाबतची माहिती देण्यात आली .या कार्यशाळेसाठी विविध कंपन्यांनी प्रायोजक देखील केले होते. या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याचे वरीष्ठ अधिकारी आणि स्थानिक उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मनीषा नायकवडी यांनी केले.यावेळी कोल्हापूर शहरासह पश्चिम महाराष्ट्र कोकण व कर्नाटकमधील मेकॅनिक्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक्स असोसिएशनचे संजय पाटणकर, इसाक मुजावर , सदा मलपुरे , प्रवीण देवेकर , प्रशांत साळोखे , संदीप पाटील , संदीप कदम आदींनी केले .