अझरुद्दीन मुल्ला यांची युवा पत्रकार संघाच्या करवीर अध्यक्ष पदी निवड.
- युवा पत्रकार संघाच्या विस्तारासाठी व
ग्रामीणमधील पत्रकारांच्या समस्येसाठी योगदान देणार.-अझरुद्दीन मुल्ला.
कोल्हापूर प्रतिनिधी .
युवा पत्रकार संघाच्या करवीर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अझरुद्दीन मुल्ला यांना संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
करवीर तालुका युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार प्रत्येक गाव वाडीत करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू, अशी ग्वाही नुतन अध्यक्ष बोल इंडिया न्यूजचे पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ अझरुद्दीन मुल्ला यांनी दिली.
अझरुद्दीन मुल्ला यांची युवा पत्रकार संघाच्या करवीर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, जावेद देवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अझरुद्दीन मुल्ला सारख्या तरुणांनी सक्रिय घटक म्हणून पुढे येणे ही बाब युवा पत्रकार संघासाठी गौरवच आहे असे मत देवडी यांनी व्यक्त केले. करवीरचे नूतन अध्यक्ष यांनी लवकरच युवा पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना युवा पत्रकार संघाच्या वतीने करवीर योद्धा 2023 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुल्ला यांनी केली. या वेळी राज्य सरचिटणीस अजय शिंगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी, जनप्रतिसाद न्युजचे संपादक जितेंद्र कळंत्रे, प्रगतधाराचे नियाज जमादार, नाझिम अत्तार उपस्थित होते.