कोल्हापुरात खरी मेकॅनिक संघटना कोणाची यावरून दोन गटात धुसफूस सुरू....!
- कोल्हापूर मधील टू व्हीलर मेकॅनिक संघटनेच्या नोंदणी आणि अन्य कारणांची चर्चा जोरात सुरू.
कोल्हापूर प्रतिनिधी:- अन्सार मुल्ला.
कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल रिपेअर ओनर हाऊस असोसिएशन, या दोघांच्या नाम साधर्म्याने सुरू झालेला वाद वेगळ्या वळणावर पोहोचलाय.
कोल्हापुरातील हजारो टू व्हीलर मेकॅनिकलसाठी विविध संघटनांनी वेगवेगळे उपक्रम घेतले आहेत. मात्र शासन दरबारी रीतसर नोंदणीकृत असलेल्या एका संघटनेचा सोमवारी होणाऱ्या एका भव्य अशा प्रशिक्षण शिबिरावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण ही तसेच आहे. कोल्हापुरातील सर्वात जुनी अशी एक असोसिएशन आहे की ज्यांच्याकडून मागील काही वर्षात विविध उपक्रम राबवण्यात आले. काही वर्षांपूर्वी एका पॉलिटिकल कॉलेजच्या प्राध्यापकाने या संघटनेशी मिळून विविध प्रशिक्षण शिबिरे राबवली. मात्र या शिबिरांच्या आयोजनासाठी मूळ संघटनेच्या नावांसारखं दुसरंच नाव वापरून ही शिबिरे पार पडली. या शिबिरामधून नवनवीन शिकावू टू व्हीलर मिस्त्रींना शास्त्रशुद्ध आणि आधुनिक प्रशिक्षण देण्यात येतं.
या प्रशिक्षणाचा मेकॅनिकल लोकांना नक्कीच फायदा होतो. मात्र एखादा उपक्रम करत असताना त्यासाठी आर्थिक तरतूद ही लागते, त्याचबरोबर एकदा नाव झालं की अशा उपक्रमांना मोठमोठे प्रायोजकही मिळतात. या प्रायोजकांकडून मोठमोठ्या देणग्या आणि साहित्य पुरविले जाते. या आर्थिक बाबी आल्यानंतर रितसर नोंदणीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख लोकांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला. यातूनच प्रसार माध्यमापर्यंत यातील कुरबुरी आल्या, याची शहानिशा केली असता अतिशय धक्कादायक बाबी एकेक करून उघड होत आहेत. जी संस्था आपल्या नावाने मोठमोठे प्रशिक्षण शिबिरे राबवते ती नोंदणी कृतच नाही. तर जी नोंदणीकृत आहे, त्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्याच नावाने कित्येक शिबिरांमध्ये प्रमुख पाहुण्यांचे पद भूषवले आहे. प्रशिक्षण जितकं गरजेच आहे, तितकंच एखादी संस्था शासन दरबारी रितसर नोंदणी असणे गरजेचे आहे. आणि आपल्या संस्थेच्या आर्थिक कारभाराची व्यवस्थित नोंद ठेवणे हेही तितकच महत्त्वाचे आहे.
भविष्यात कोल्हापूर जिल्हा मेकॅनिकल असोसिएशन आणि त्याच्या सभासदांचे शासन दरबारी नोंद रीतसर असणे गरजेचे आहे. जर का अशाच पद्धतीने कारभार चालत राहिला तर भविष्यात मोठा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याबाबत आम्ही नोंदणी कृत नसणारे, पण प्रशिक्षण शिबिर घेणारे पाटणकर यांच्याशी बोललो. तर नोंदणीकृत असणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांशी देखील बोललो एकंदरीत या सर्वांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून भविष्यात मेकॅनिकल असोसिएशन आणि त्याच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.