प्रतिनिधी :- शैलेश माने.
आतापर्यंत डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अनेक स्पर्धांच्या माध्यमातून देशविदेशातील व कोल्हापूर सह इतर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. यात पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन, कराड येथे प्राईड रन हाफ मॅरेथॉन,बर्गमॅन ट्रायथलॉन अशा स्पर्धाचा समावेश आहे.
५ व १० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असून राजाराम तलाव येथे ही स्पर्धा होत आहे.या स्पर्धेमध्ये एकूण 700 स्पर्धकांचा सहभाग आहे.
स्पर्धेचे अंतर असे आहे.
५ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे. ही स्पर्धा राजाराम तलाव येथे सुरू होणार आहे.ती शाहू टोल नाका येथून पुन्हा राजाराम तलाव येथे समाप्त होणार आहे.
१० किलोमीटर ची स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार असून ती राजाराम तलाव येथे सुरू होणार आहे.ती पुढे शाहू टोल नाका,बी.एस. एन. एल टॉवर व पुन्हा राजाराम तलाव अशी असणार आहे.
स्पर्धेमधील वयोगट असे आहेत
५ किलोमीटर स्पर्धा ही १४ ते ३०, ३१ ते ४० व ४१ ते ५० आणि ५१ वर्षा पुढील सर्वांसाठी आहे.
तर १० किलोमीटर ची स्पर्धा ही १६ ते ३०,३१ ते ४०,४१ ते ५०,व ५१ वर्षावरील सर्व अशा वयोगटात होणार आहे.
सहभागी सर्व स्पर्धकांना मिळणार किट
जवळजवळ 700 स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप ई - सर्टिफिकेट नाश्ता हा दिला जाणार आहे.
स्पर्धेसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,सबीर शहा,डिंम्पल त्रिवेदी, सोनाली पाटील,समीर चौगुले,अनुजा मेहेंदळे ,धर्मेश मेहेंदळे आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.