*सांगलीतील यशोधन कार्यालयात आज, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक 12 मार्च रोजी निघणाऱ्या* *विराट मोर्चासाठी एक व्यापक बैठक संपन्न--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
सांगली आज जुन्या पेन्शनची योजना लागू होण्यासाठी ,दिनांक 12 मार्च रोजी निघणाऱ्या विराट मोर्चाच्या जयत तयारीसाठी, पृथ्वीराज बाबांच्या आदेशानुसार यशोधन कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील हजारो कर्मचारी कर्मवीर अण्णांच्या चरणी नतमस्तक होऊन, जुनी पेन्शन योजना लागू होणेबाबत साकडे घालून, कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दि. १२ मार्च रोजी स. १० वा. विराट मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व निमंत्रक म्हणून जबाबदारी विविध संघटनांनी पृथ्वीराज पाटील यांचेकडे सोपवली आहे.
आज दि. १० मार्च २०२३ रोजी विराट मोर्चा आयोजन तयारी आढावा बैठक पृथ्वीराज बाबांच्या आदेशानुसार यशोधन संपर्क कार्यालयात दु.१ ते ३ या वेळेत पार पडली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मोर्चा आयोजनासाठी केलेले सूक्ष्म नियोजन (micro planning) व त्याप्रमाणे झालेली कामे व उर्वरित तयारी याची माहिती दिली. त्यामध्ये
१) मा. जिल्हा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाची मोर्चा परवानगी.. काल पत्र तयार करुन दिले. बाबांचे कर्तव्यदक्ष स्वीय सहायक अक्षय पाटील यांनी परवानगी आणली आहे.
२)स्टेशन चौकात होणाऱ्या सभेला महानगरपालिकेची मान्यता मिळणेसाठी पत्रव्यवहार व सभेच्या व्यवस्थेची तयारी पूर्ण केल्याचे अक्षय यांनी सांगितले.
३)मोर्चेकऱ्यांच्या हातात देण्यासाठी फलक तयारी बाबत सूचना केल्या.फलकावरील २० घोषवाक्यांचा मसुदा अमोल शिंदे यांचेकडे दिला. आशिष चौधरी यांचेकडे फलक तयार करण्याची जबाबदारी देत असल्याचे अक्षय यांनी सांगितले.
४)स्टेशन चौकात सभेवेळी पाण्याचे बाॅटल पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तेथेच जार माध्यमातूनही पिण्याच्या पाण्याची सोय करणेत येणार आहे.
५)एकच मिशन.. जुनी पेन्शन असा मजकूर असलेल्या टोप्या तयार करुन घेण्यात येतील. या कामी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने आर्थिक हातभार लावला जाईल असे संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील अण्णा यांनी सांगितले आहे अशी माहिती अक्षय यांनी दिली.
६)मोर्चा मार्ग व वाहनतळ यांचे नकाशे तयार करुन सोशल मिडियावर अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
७)मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना उद्देशून निवेदन मसुदा तयार करुन दिला आहे. बाबांनी अवलोकन केल्यानंतर तो फायनल होईल.
८)फोटोग्राफी व व्हिडीओ चित्रण व्यवस्था करण्यात आली आहे असे अक्षय यांनी सांगितले आहे.
९)सर्व संघटना पदाधिकारी यांना मोर्चा सहभाग वाढावा यासाठी यशोधन संपर्क कार्यालयातून फोन करण्याची व्यवस्था झाली आहे.
१०)तालुकानिहाय संघटना पदाधिकारी संपर्क बैठकीत व फोनवरून उपस्थिती बाबत प्रबोधन सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने गाड्या करुन कर्मचारी सहकुटुंब येतील असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बाबांचे स्वीय सहायक अक्षय पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे, अमोल शिंदे, गणेश धुमाळ, विवेक कुरणे राजेंद्र नागरगोजे, अरविंद जैनापुरे, शेखर साठे उपस्थित होते. मोर्चा विराट होणार आणि जुन्या पेन्शनचा आवाज विधिमंडळात घुमणार एवढे मात्र निश्चित..!