सांगलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या व गॅस- डिझेल -पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर, मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन,दि. 14 /4/ 2013 रोजी आमरण उपोषणाचा इशारा
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्ना्ंवर , गॅस -डिझेल- पेट्रोल दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंचे महागाई बाबत तसेच शैक्षणिक व पुनर्वसन बाबत माननीय जिल्हाधिकारी यांना एक उद्या दिनांक ८ मार्च२०२३ रोजी निवेदन देण्यात येणार आहे. सदरच्या प्रश्नावर एक महिन्याचे आत सोडवणूक झाले नाहीत तर, जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 11 /4/ 20 23 रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
सदरच्या विषयावर काँग्रेस भवन सांगली येथे आज दि.७ मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष तात्या खोत, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले ,इंटर युनियनचे जिल्हा अध्यक्ष डी.पी. बनसोडे, ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक शिंदे ,राजपूत ,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुशील गोतपाघर, जिल्हा काँग्रेसचे आदिनाथ मगदूम, बाब गोंडा पाटील, श्रीधर बार टक्के, विनोद जमादार ,अत्तर पाशा पटेल ,मौलाली वंटमोरे ,नामदेव पठाडे ,विश्वास यादव ,मुनीर शिकलगार, पैगंबर शेख, कांचन खंदारे, माधुरी गंगणे, सुनीता मदने, सुभाष पटनशेट्टी, विठ्ठलराव काळे, कोळेकर ,सुरेश गायकवाड, खुदबुद्दीन मुजावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.