सांगली जिल्ह्यातील सांगलीसह सात बाजार समित्यांच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी, सोमवारी दि. 20 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध होणार---
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगली जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकी संदर्भात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, सुमारे 16 जणांनी प्रारूप मतदार यादी संबंधात हरकती दाखल केल्या होत्या. नुकतीच या सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन, अंतिम मतदार यादी सोमवार दि. 20 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण सुमारे 24, 000 मतदार मतदानास पात्र असून, त्यातील सुमारे 8,000 मतदार हे सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी, प्रारूप मतदार यादीवर 16 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी सांगली बाजार समितीच्यासाठी सात हरकती दाखल होत्या. नुकत्याच दाखल झालेल्या 16 हरकतींची सुनावणी घेऊन, अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे. एकंदरीत सांगली जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ,सांगली बाजार समितीची निवडणूक ही राजकारणामध्ये प्रतिष्ठेची व अत्यंत संवेदनशील क्षेत्रात गणली जाते. सहकार विभागाकडून जिल्ह्यातील सातही बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय निवडणुकीच्या हालचालीना गती प्राप्त होणार असून, बहुतेक राजकीय इच्छुकांच्यां मोर्चे बांधणीस त्यानंतर सुरूवात होईल. एकंदरीत सांगलीचे वातावरण बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करून, राजकीय दृष्ट्या ढवळून निघण्याची शक्यता आहे.