*महाराष्ट्र राज्यात पुन्हा सोमवार नंतर अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता ----पुणे वेधशाळा हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात सध्या अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून, काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे, शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेले पिके वाया जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे .यामुळे शेतकऱ्यांना या अस्मानी नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या नैसर्गिक अस्मानी संकटामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यात पुन्हा सोमवारनंतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस जोरदारपणे होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्याबरोबरच आपल्या शेतमालाची योग्य ती निगा व काळजी घेण्यात यावी अशी सूचना वेधशाळे कडून देण्यात आलेली आहे. एकंदरीत राज्यातील हवामान दोन- चार दिवस ढगाळ राहून, राज्याच्या उत्तर भागात ,अवकाळी पाऊस पडण्याचा शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दिनांक 16 मार्च व 17 मार्च रोजी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानाशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील उत्तर मराठवाड्यासह उत्तर कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्र जिल्ह्यातील काही ठिकाणी, विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे .मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. एकंदरीत 16 मार्च ते 17 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असून ,वाऱ्यांचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता हवामान खात्याच्या विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली आहे. उत्तर भारतातील पश्चिमीचक्रवात सक्रिय झाल्याने ,शहरात 13 व 15 मार्च रोजी पण मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे .याच दरम्यानच्या काळात पुणे शहर व जिल्ह्यातही ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.