*राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे वरील कारवाई अत्यंत धक्कादायक--- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे वरील कारवाई अत्यंत धक्कादायक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे .यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाने व ईडी खात्याने धाडी घालून खोटे गुन्हे दाखल केले आहेत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसनमुश्रीफ यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत ,स्थानिक नागरिकांच्या मध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विरोधात असल्यामुळे, एकाच ठिकाणी धाडी टाकून, गेले दोन वर्षापासून हा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त विरोधामधील लोकांच्या वरच ही कारवाई होत असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेही चौकशी व अर्जाची दखलही घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हणले आहे.